Showing posts with label humor. Show all posts
Showing posts with label humor. Show all posts

Monday, October 14, 2019

जिराफ आणि त्याची मान

एक जिराफ होता. त्याला एकदा उंच झाडावरची पानं खायची होती. त्याने ती पाने खायला सुरवात केली, पण तो एकदम घाबरून गेला. त्याला वाटले की त्याची मान उंच उंच होत आहे.

त्याने त्याचा मित्र मंकी ला बोलावले. तो म्हणाला, "बघ ना... माझी मान लांब लांब होत आहे." मंकी म्हणाला, "थांब, तू घाबरू नकोस. आपण डॉक्टरला बोलवूयात."

मंकीने लायन डॉक्टरला बोलावले. हा लायन डॉक्टर चांगला होता. कोणाला खायचा नाही, कारण तो डॉक्टर होता ना! त्या लायनचा फ्रेंड असतो lion king. तो खायचा सगळ्यांना.

लायन डॉक्टर आला. त्याने विचारले जिराफाला, "काय झालं रे?"

जिराफ म्हणाला, "माझी मान बघा ना, लांबच लांब झाली आहे."

डॉक्टर म्हणाले, "थांब हां, मी चेक करतो."

डॉक्टरने त्याला चेक केले. आणि म्हणाले, "अरे, तुला तर काहीच झाले नाहीये. तुला उंच पानं खायची होती ना! म्हणून तूच तुझी मान लांब केलीस!"

जिराफ म्हणाला, "अच्छा! असा होय!"

सगळे लोग जिराफ वर खूप हसले!

Thursday, August 23, 2018

पेंग्विन आणि चोर

एक मॅन होता. त्याने एका ट्री वर छान फुलं बघितली...लोटस. छान वास येत होता सकाळी. एका दुसऱ्या माणसाचे ट्री होते. तर पहिल्या मॅन ने ती फुलं चोरली. फक्त एक फूल घेतलं, मग दुसरं, मग सगळी फुलं घेऊन गेला. बायकोकडे गेला. ती खूप चांगली होती. त्याने तिला surprise दिली फुलं. पण त्याने चोरी केली होती ना. मग तिने त्याला बाहेर काढलं. 
एक दिवशी त्याने एका मुलीचे टेडी बेअर चोरले. 
हे सगळे कोण बघत होते माहिती... एक पेंग्विन.

थोड्या दिवसांनी ज्याचे झाड होते तो माणूस आला ट्री ला पाणी घालायला. तिथे एक शिडी दिसली त्याला. आणि बघतो तर काय! फुलं गेलेली! त्याला चोर माहित होता. तो चोराच्या घरी गेला. चोर आत बसला होता. तो हळूच मागून गेला आणि चोराच्या पॉकेट मध्ये आग चं  पत्र टाकलं (Like the Howler in Harry Potter, I think!) आणि निघून गेला. 

मग तो चोर जोरजोरात ओरडायला लागला, "आई आई आई बाबा बाबा बाबा!"

मग मोटू-पतलू आणि चिंगम आले. त्या चोराला म्हणाले, "तुला वरती आकाशात टाकले पाहिजे!" पतलूने हॅन्ड पकडला आणि आकाशात टाकले. तो वरून धाड करून रस्त्यावर पडला. मग चिंगम ने handcuffs लावल्या. चोराला जेलमध्ये टाकलं. 

मग चोराची बायको, मोटू-पतलू , चिंगम हे सगळे फ्रेंड्स झाले आणि एकत्र राहायला लागले!





The moral of the story is you should not pluck flowers and fruits.

Friday, June 1, 2018

सिंह, आंबा, बकरी, आणि बिस्कीट

मी महिकाला एक दिवस विचारले की तुला गोष्टीमध्ये कोण कोण हवे आहे? तेव्हा तिने मला सिंह, आंबा, बकरी, आणि बिस्कीट हे सगळे पाहिजेत गोष्टीत असे सांगितले. म्हणून ही गोष्टं ...

एके दिवशी एक बकरी रस्त्याने जात होती. जाता-जाता  तिला रस्त्यात biscuits पडलेली दिसली. ती खात-खात ती जायला लागली. तिच्या लक्षातच नाही आलं की चालता-चालता ती पोचली जंगलात.

जंगलात ती चालत होती घाबरत घाबरत. तेव्हड्यात तिच्या समोर आला एक सिंह. तो तिला म्हणाला, "बरं झालं बकरी तू आलीस! मला भूकच लागली होती. आता मी तुला खाऊन टाकतो!"

"नको रे नको सिंह दादा, मला नको खाऊस! मी तुला दुसरा खाऊ देते."

"छे! तुला सोडून दुसरा खाऊ कशाला खाऊ मी!"

तेव्हड्यात बकरीला आंब्याचे झाड दिसले. उन्हाळ्याचे दिवस होते. झाडाला भरपूर आंबे लागले होते. ती सिंहाला म्हणाली, "अरे तू कधी आंबा खाल्ला आहेस का?"

"आंबा? काय असतो आंबा? कसा असतो? कसा लागतो?"

"थांब, मी देते तुला खायला आंबा."

बकरीच्या झाडावरचा पिकलेला आंबा दिला. सिंहाला दाखवला कसा खायचा ते. सिंहाने जरा घाबरत-घाबरतच खायला सुरवात केली.

पहिली चव घेतली आणि त्याला इतका आवडला आंबा!

"वाह! काय मस्त आहे हा आंबा! Yummy yummy!!"

असा म्हणत म्हणत सिंहाने दाबून आंबे खाल्ले! आणि आंब्यासारखी मस्त गोष्टं खायला दिली म्हणून त्याने बकरीला सोडून दिले. आणि दोघेही friends झाले!

Monday, April 16, 2018

राजा आणि राक्षसी


एका जंगलात एक राजा राहत होता. त्याला अजिबात भीती नाही वाटायची. कारण त्याच्याकडे सगळे त्याचे शिपाई होते.

तो एकदा नदीपाशी गेला. नदीतून एक cocokoyle (crocodile) राक्षसी आली. ती त्याला म्हणाली, तू माझ्या तोंडात जा. राजा bird सारखा fly करायला लागला आणि तिच्या तोंडात आत जाऊन पटकन बाहेर आला.

राक्षसी खूप चांगली होती. ती त्याची friend झाली.

एक दिवस राजा जंगलातल्या देवळाजवळ गेला. तिथे खूप सारे राक्षस उभे होते. असे एकदम straight. आणि ते त्याला खायला आले. तेव्हड्यात तिथे friend राक्षसी आली. तिने त्या सर्व राक्षसांना धडा शिकवला, कारण ते तिच्या friend ला त्रास देणार होते. मग राजा friend राक्षसीला thank you म्हणाला.

मग राक्षसी राजाला तिच्या husband कडे घेऊन गेली. तो husband पण तिच्या friends बरोबर friends झाला.

अशी झाली friend राक्षसी आणि राजाची गोष्टं. 

Thursday, October 26, 2017

बिस्कीटची गोष्टं


"आया, आज मी एक बिस्कीटची गोष्टं ऐकली."

"अर्रे वाह! मला पण सांग ना!"

"एक बिस्कीट असतं. त्याला सगळे खायला बघत असतात. ते बिस्कीट मग खूप fast fast पळायला लागतं.

मग सगळे त्याच्या मागे पळतात."

"मग ते पळून जातं का घरी?"

"नाही ते एका fox वर जाऊन उभं राहतं. आणि मग fox सच त्याला खाऊन टाकतं."

"अरे बापरे! म्हणजे ते सगळ्यांपासून पळून जातं, पण fox खातोच त्याला शेवटी!"

Thursday, August 31, 2017

चांगले दिसतील

"आया, गाडीवरून जाताना सगळे लोकं गपचूप का असतात?"

"मग काय करायचं त्यांनी?"

"मोठ्यांनी गाणी म्हणायला पाहिजे."

"अच्छा."

"चल, आपण मोठ्यांदा गाऊयात. "

मग आया आणि महिका Baa baa black sheep आणि Wheels on the bus गातात कारमध्ये शाळेतून घरी परत येताना.

"महिका, imagine सगळे गाडीवरून जाताना मोठ्याने गाणी म्हणत गेले तर कसे दिसतील!"

"चांगले दिसतील!"

Wednesday, August 2, 2017

पांडा आणि हत्ती

ही गोष्ट मी सांगितली महिकाला. तिला हत्तीची गोष्ट हवी होती. मी म्हणाले हत्ती आणि पांडा दोघांची सांगते.

एक हत्ती होता. त्याला लहानपणापासून पोहायला आवडायचे. तो नदीत नेहेमी पोहायला जायचा.

एकदा त्या जंगलात पांडा आला. पांडाने सगळ्यांशी दोस्ती केली. सर्व animals चा friend झाला.

एके दिवशी तो पांडा खूप sad होऊन बसला होता. त्याला सश्याने विचारले, "काय झालं  तुला? असा sad का झाला आहेस?"

पांडा म्हणाला, "मला माझ्या sister कडे जायचं आहे."

"मग जा की!"

"पण ती नदीच्या पलीकडच्या जंगलात राहते."

"मग फोन कर तिला."

"नाही, मला भेटायचं आहे. राखी करता."

"ओह! मग आता काय करणार?"

"काय माहित!"

दुसऱ्या दिवशी ससा हत्तीला भेटला. तेव्हा हत्तीने विचारले, "काय रे? पांडाला काय झालं?"

सश्याने सांगितले काय झाले ते.

हत्ती म्हणाला, "हात्तिच्या! एव्हढच ना! तू एक काम कर. तू उद्या पांड्याला घेऊन नदीपाशी ये."

"का?"

"तू ये तर खरं. तिथे आल्यावर सांगेन काय ते."

सश्याने निरोप सांगितला पांडाला. पांडा दुसऱ्या दिवशी नदीपाशी गेला. तिथे हत्ती आलेला होता.

हत्ती म्हणाला, "चल, तुला जायचंय ना तुझ्या sister कडे?"

"हो. पण कसं जायचं?"

"मी नेतो ना तुला. तू माझ्या पाठीवर बस. मी पोहत नेतो तुला त्या बाजूला."

"तू खरंच नेशील मला?"

"हो, नेईन की! चल लवकर."

"थांब, थांब!"

"आता काय झालं?"

"मी माझ्या sister  करता gift नाही घेतली."

"चल, आपण जाऊन घेऊयात."

हत्ती आणि पांडा दोघे दुकानात गेले. तिथे पांडाला एक छानशी उशी आवडली. पण तो म्हणाला हत्तीला, "ही उशी तर पाण्यातून जाताना ओली होईल."

"अर्रे काही नाही ओली होणार. तू ही उशी मस्त sack मध्ये ठेव. sack पाठीला लाव. मी तुला बुडवणार नाही. मस्त माझ्या पाठीवर बस आणि आपण जाऊ."

पांडाला पटलं. त्याने उशी घेतली. दोघे नदीवर आले. पांडा हत्तीच्या पाठीवर बसला. हत्ती पाण्यात शिरला. मस्त पोहत पोहत दुसऱ्या काठावर गेला.

पांडा sister च्या घरी गेला आणि बेल वाजवली. तो हत्तीला म्हणाला, "मी लपून बसतो. आपण surprise देऊयात."

पांडाच्या sister ने दार उघडलं आणि हत्तीला विचारलं, "कोण आहे?"

"मी हत्ती आहे. शेजारच्या जंगलातून आलोय."

"OK. काय हवाय तुम्हाला?"

तेव्हड्यात पांडा आला तिच्या समोर आणि ओरडला, "Surprise!"

Sister ला खूप आनंद झाला. तिने पांडाला राखी बांधली. त्याला t-shirt gift दिला. पांडाने पण तिला gift दिले. तिला उशी खूप आवडली.

मग पांडा आणि हत्ती जेवले. संध्याकाळी परत घरी आले. पांडा हत्तीला "Thank You!" म्हणाला  दोघेही best friends झाले.

Thursday, June 15, 2017

Biscuit दादा

Mahika asked me whose story I wanted to hear. I told her to tell me a story of a biscuit. Here's what she told...

Once upon a time, एक Biscuit दादा असतो. त्याचे आया-बाबा आणि तो आजी-आजा कडे जातात. का? कारण त्याच्या आजांना बरं नसतं. त्यांना खोकला आणि उलट्या होत असतात. मग ते डॉक्टरकडे जातात. डॉक्टर त्यांना उचूक (injection) देतात. मग ते बरे होतात. मग सगळे huggy देतात. (Everyone hug each other.) मग आजा घरी येतात. मग Biscuit दादा आणि आजा घर share-share करतात.

मग Biscuit दादा विचार करतो. तो म्हणतो, "असंच काहीतरी केलं पाहिजे, केलं पाहिजे, केलं पाहिजे." त्याला आयडिया (idea) सुचते. तो डॉक्टरकडे जातो. आणि डॉक्टरच्या बाबालाच उचूक देतो.

मग एक दिवस काय होतं, एक हत्ती येतो. हत्ती त्यांचा friend असतो. ते सगळे जंगलात जातात. जंगलात टाटिस (राक्षस) असतो. मग आजा हातात एक दगड घेतात. एक मोठा दगड. आणि टाटिसला मारतात. मग टाटिस मरतो.

सगळे मग huggy देतात. सगळे मग घरी जातात आणि happily राहतात. (Happily ever after.)

Thursday, June 8, 2017

ससा आणि बाप्पा मोरया

एक ससा असतो. त्याला खूप भूक लागली असते. तो बाप्पा मोरया (गणपती) कडे जातो. 

तो त्याला विचारतो, "तुझ्याकडे carrots आहेत का?" 

बाप्पा मोरया म्हणतो, "हो, माझ्याकडे भरपूर carrots आहेत."

"मग मला थोडी देशील का?"

"हो, देईन की!"

"आणि तुझ्याकडे पाणी आहे का?"

"हो, माझ्याकडे भरपूर सारं पाणी आहे."

"मग मला थोडं देशील का?"

"हो, देतो ना."

(महिकाला तेव्हड्यात बाबाचा फोने दिसला) बाप्पा मोरया मग त्याच्या बाबाला, म्हणजे शंकर बाप्पा ला phone  लावतो. 

त्याला विचारतो, "बाबा आपण सश्याला carrots आणि पाणी द्यायचं का?"

शंकर बाप्पा हो म्हणतो. मग बाप्पा मोरया सश्याला carrots  आणि पाणी देतो. ससा खूप happy होतो. तो बाप्पा मोरयाला "थांकू" म्हणतो आणि निघून जातो. 

Wednesday, February 8, 2017

भूभू ची गोष्ट

ही गोष्ट आज सकाळी महिकाने सांगितली:

एक भूभू असतो. तो जंगलमध्ये असतो. त्याचे आया-बाबा असतात. ते पण असतात जंगलमध्ये. त्याचे बाबा आणि भूभू बॉल खेळत असतात. आणि त्याची आया खुर्चीवर बसली असते. ते छान-छान बॉल खेळतात म्हणून आया clap clap करते.

खूप ऊन असतं. सूर्यमामा असतो ना! मग ते बॉल खेळात असतात. मग रात्र होते. मग ते तिघे असे झोपून जातात (झोपण्याची acting करून दाखवली!)

मग सकाळी उठतात. आणि तिघे पण स्कूलला जातात.

(गोष्ट एव्हढीच होती. बहुदा सकाळी शाळेत जायच्या आधी सांगितल्याने भूभूदेखील सकाळी उठून शाळेत जातो.)

Tuesday, December 13, 2016

राक्षस आणि ताटीका

 महिका आणि मी कार मधून जाताना:

महिका: मी तुला एक ताटीस (राक्षस) आणि एक ताटीका ची स्टोरी सांगू का?
मी: हो, सांग की.
महिका: थांब मला विचार करू देत.
मी: ओके, तू विचार कर.
महिका: एक ताटीस असतो. तो खूप वेळ थांबला असतो.
मी: कशाला थांबला असतो?
महिका: अगं, मंमं करायला.
मी: अच्छा. मग मिळतं का त्याला?
महिका: नाही ना. मग तो हॉटेल मध्ये जातो. पण तिथे पण त्याला पुरी मिळताच नाही.
मी: अर्रे बापरे. मग तो काय करतो?
महिका: तो बसून राहतो. मग तिथे ताटीका येते.
मी: अरे वाह! ती पण येते का हॉटेल मध्ये? ती काय करते?
महिका: ती पण येते आणि पुरी खाते. पुरी तिच्या पोटात जाते.
मी: अरे वाह! तिला मिळते का पुरी! आणि मग राक्षस काय खातो?
महिका: अरे तो पण पुरी खातो.
मी: Nice. मग काय होतं?
महिका: ताटीका ice cream खाते.
मी: Wow! मग राक्षस पण खातो का?
महिका: नाही तो अजून पुरी खातोय. मग नंतर खातो तो ice cream.
मी: गुड.
महिका: पण तो चमच्याने नाही खात.
मी: अरे! कसं  काय? मग कसा खातो ice cream?
महिका: तो बोटाने खातो, असा चाटत.
मी: हो का?
महिका: हो.

संपली गोष्ट!

Thursday, December 1, 2016

भूत आणि राक्षस

ही गोष्ट मला महिकाने सांगितली. तिने स्वतः तयार केली.

एक भूत असतं. ते खूप ढिशुम ढिशुम करतं 'wolves' बरोबर. आणि मग ते 'happy' होतं.
(This is one part of the story. There's another part that is not really connected to this, but which happens parallel to this, I think.) 
एक राक्षस असतो, baby  राक्षस. तो काय करतो माहितीये? तो एका समोरच्या माणूसला 'gadu gadu' करतो (गुदु गुदु). आणि मग तो माणूस खूपच हसतो आणि खाली पडतो. मग राक्षस हेल्मेट घालतो. आणि झुकझुक गाडी चालवत जातो. कुठे माहितीये? Mall मध्ये. आणि तिथे त्याला कोण भेटतं माहितीये... आया, बाबा, आणि अनय दादा. आणि मग सगळे निघतात. सगळे परत येतात. 

आया: अरे वा! मस्त गोष्ट आहे. मग mall मध्ये त्या 'टाटीस' (महिका राक्षसाला टाटीस म्हणते.) ला महिका पण भेटते का?
महिका: नाही, महिका नाही भेटत.


ही साठा उत्तराची कहाणी पाचा  उत्तरी सुफळ संपूर्ण!