Tuesday, December 13, 2016

राक्षस आणि ताटीका

 महिका आणि मी कार मधून जाताना:

महिका: मी तुला एक ताटीस (राक्षस) आणि एक ताटीका ची स्टोरी सांगू का?
मी: हो, सांग की.
महिका: थांब मला विचार करू देत.
मी: ओके, तू विचार कर.
महिका: एक ताटीस असतो. तो खूप वेळ थांबला असतो.
मी: कशाला थांबला असतो?
महिका: अगं, मंमं करायला.
मी: अच्छा. मग मिळतं का त्याला?
महिका: नाही ना. मग तो हॉटेल मध्ये जातो. पण तिथे पण त्याला पुरी मिळताच नाही.
मी: अर्रे बापरे. मग तो काय करतो?
महिका: तो बसून राहतो. मग तिथे ताटीका येते.
मी: अरे वाह! ती पण येते का हॉटेल मध्ये? ती काय करते?
महिका: ती पण येते आणि पुरी खाते. पुरी तिच्या पोटात जाते.
मी: अरे वाह! तिला मिळते का पुरी! आणि मग राक्षस काय खातो?
महिका: अरे तो पण पुरी खातो.
मी: Nice. मग काय होतं?
महिका: ताटीका ice cream खाते.
मी: Wow! मग राक्षस पण खातो का?
महिका: नाही तो अजून पुरी खातोय. मग नंतर खातो तो ice cream.
मी: गुड.
महिका: पण तो चमच्याने नाही खात.
मी: अरे! कसं  काय? मग कसा खातो ice cream?
महिका: तो बोटाने खातो, असा चाटत.
मी: हो का?
महिका: हो.

संपली गोष्ट!

1 comment: