ही गोष्ट मी सांगितली महिकाला. तिला हत्तीची गोष्ट हवी होती. मी म्हणाले हत्ती आणि पांडा दोघांची सांगते.
एक हत्ती होता. त्याला लहानपणापासून पोहायला आवडायचे. तो नदीत नेहेमी पोहायला जायचा.
एकदा त्या जंगलात पांडा आला. पांडाने सगळ्यांशी दोस्ती केली. सर्व animals चा friend झाला.
एके दिवशी तो पांडा खूप sad होऊन बसला होता. त्याला सश्याने विचारले, "काय झालं तुला? असा sad का झाला आहेस?"
पांडा म्हणाला, "मला माझ्या sister कडे जायचं आहे."
"मग जा की!"
"पण ती नदीच्या पलीकडच्या जंगलात राहते."
"मग फोन कर तिला."
"नाही, मला भेटायचं आहे. राखी करता."
"ओह! मग आता काय करणार?"
"काय माहित!"
दुसऱ्या दिवशी ससा हत्तीला भेटला. तेव्हा हत्तीने विचारले, "काय रे? पांडाला काय झालं?"
सश्याने सांगितले काय झाले ते.
हत्ती म्हणाला, "हात्तिच्या! एव्हढच ना! तू एक काम कर. तू उद्या पांड्याला घेऊन नदीपाशी ये."
"का?"
"तू ये तर खरं. तिथे आल्यावर सांगेन काय ते."
सश्याने निरोप सांगितला पांडाला. पांडा दुसऱ्या दिवशी नदीपाशी गेला. तिथे हत्ती आलेला होता.
हत्ती म्हणाला, "चल, तुला जायचंय ना तुझ्या sister कडे?"
"हो. पण कसं जायचं?"
"मी नेतो ना तुला. तू माझ्या पाठीवर बस. मी पोहत नेतो तुला त्या बाजूला."
"तू खरंच नेशील मला?"
"हो, नेईन की! चल लवकर."
"थांब, थांब!"
"आता काय झालं?"
"मी माझ्या sister करता gift नाही घेतली."
"चल, आपण जाऊन घेऊयात."
हत्ती आणि पांडा दोघे दुकानात गेले. तिथे पांडाला एक छानशी उशी आवडली. पण तो म्हणाला हत्तीला, "ही उशी तर पाण्यातून जाताना ओली होईल."
"अर्रे काही नाही ओली होणार. तू ही उशी मस्त sack मध्ये ठेव. sack पाठीला लाव. मी तुला बुडवणार नाही. मस्त माझ्या पाठीवर बस आणि आपण जाऊ."
पांडाला पटलं. त्याने उशी घेतली. दोघे नदीवर आले. पांडा हत्तीच्या पाठीवर बसला. हत्ती पाण्यात शिरला. मस्त पोहत पोहत दुसऱ्या काठावर गेला.
पांडा sister च्या घरी गेला आणि बेल वाजवली. तो हत्तीला म्हणाला, "मी लपून बसतो. आपण surprise देऊयात."
पांडाच्या sister ने दार उघडलं आणि हत्तीला विचारलं, "कोण आहे?"
"मी हत्ती आहे. शेजारच्या जंगलातून आलोय."
"OK. काय हवाय तुम्हाला?"
तेव्हड्यात पांडा आला तिच्या समोर आणि ओरडला, "Surprise!"
Sister ला खूप आनंद झाला. तिने पांडाला राखी बांधली. त्याला t-shirt gift दिला. पांडाने पण तिला gift दिले. तिला उशी खूप आवडली.
मग पांडा आणि हत्ती जेवले. संध्याकाळी परत घरी आले. पांडा हत्तीला "Thank You!" म्हणाला दोघेही best friends झाले.

No comments:
Post a Comment