Thursday, August 31, 2017

चांगले दिसतील

"आया, गाडीवरून जाताना सगळे लोकं गपचूप का असतात?"

"मग काय करायचं त्यांनी?"

"मोठ्यांनी गाणी म्हणायला पाहिजे."

"अच्छा."

"चल, आपण मोठ्यांदा गाऊयात. "

मग आया आणि महिका Baa baa black sheep आणि Wheels on the bus गातात कारमध्ये शाळेतून घरी परत येताना.

"महिका, imagine सगळे गाडीवरून जाताना मोठ्याने गाणी म्हणत गेले तर कसे दिसतील!"

"चांगले दिसतील!"

Wednesday, August 9, 2017

Reena आणि Elly

एक माउचं छोटं पिल्लू असतं, त्याचं नाव Elly असतं. Elly तिच्या आई-बाबांबरोबर राहत असते. ते एका घराच्या गॅरेज मध्ये राहत असते. Elly दररोज बघत असते की तिच्या घरातली दीदी - रीना स्कूलला जात असते. सकाळी लवकर रीना बॅग आणि डबा घेऊन yellow बस मध्ये बसून जाते.

Elly दररोज तिला बघून विचार करायची, "मला कधी बसमध्ये बसायला मिळणार?" Elly तिच्या आईला नेहेमी म्हणायची, "आई, मला कधी स्कूल बस मध्ये बसायला मिळणार?" आणि आई सांगायची, "अगं, तू लहान आहेस. मोठी झाली की जाशील."

Elly विचार करायला लागते की आपण स्कूल बस मध्ये कसे जाऊ शकतो बरं? काय करू शकतो? असा विचार करता करता तिच्या डोक्यात एक idea येते. आणि ती म्हणते, "हां, असंच काही तरी केलं पाहिजे, केलं पाहिजे, केलं पाहिजे!!!"

दुसऱ्या दिवशी लवकर उठते ती. तयार होते. आईला सांगते, "आई मी फिरून येते." आई म्हणते, "जवळच जा हां Elly, लांब जाऊ नकोस." Elly म्हणते, "नाही, नाही. मी इथेच आहे हां." आणि हळूच गॅरेज मधून घरात जाते.

घरात Elly बघते कि रीना आणि रीनाच्या आईची स्कूलला जायची गडबड चालू आहे. Elly खिडकीतून आत नजर टाकते. सगळीकडे बघते. ती जी गोष्टं शोधात असते ती दिसते - रीनाची स्कूलबॅग. Elly खिडकीतून आत उडी मारते. लपत - छपत जाते आणि स्कूलबॅग मध्ये टुणकन उडी मारून लपून बसते.

रीनाची आणि तिच्या आईची गडबड चालूच असते.

"रीना दूध लवकर पी. स्कूलची बस आत्ता येईल."

"हो गं आई, पिते पिते."

तेव्हड्यात Elly जी बॅगेत बसली होती, ती बॅग हलायला लागते. कारण रीना तिची बॅग उचलते स्कूलला जायला. बाहेर हॉर्न ऐकू येतो - बीप बीप! रीना आईला ओरडून सांगते, "आई बस आली, मी जाते." आई धावत बाहेर येते. "बाय, नीट रहा हां!"

रीना पळत-पळत जाते आणि बस मध्ये बसते. रीनाला माहीतच नसतं की बॅगमध्ये Elly बसली आहे.  ती विचार करते, "माझी बॅग इतकी जड का बरं वाटत आहे?" तेव्हड्यात तिला तिची friend भेटते. रीना विचार करते, "जाऊन देत. असेल काहीतरी मी ठेवलेलं."

Elly ने हळूच डोकं बाहेर काढून बघितला आजूबाजूला. yellow बस मध्ये बसलेले ताई-दादा दिसले तिला. एक मावशी होत्या सांभाळणाऱ्या. सगळी मुलं गप्पा मारत असतात. मधेच त्या मावशी म्हणतात, "पोरांनो, ओरडू नकात जास्त. निखिल हात का बाहेर काढतोय? आत घे. पिहू, तू डुलक्या का घेत आहेस? उठ उठ लवकर. स्कूल येईल आता. जागे व्हा सगळे!" 

थोड्या वेळाने मावशी म्हणाल्या, "चला जवळ आली आहे स्कूल. आपण स्कूलला पोचायच्या आधी स्तोत्र म्हणतो ते म्हणूयात. सगळे मिळून!"

सगळी मुलं हात जोडतात आणि स्तोत्र म्हणतात:


दोन-तीन मिनिटात स्कूल येते. रीना आणि तिचे सर्व friends गाडीतून उतरतात. Elly हळूच बघताच असते बॅगेतून कुठे जातोय ते. तिला भारी मज्जा येत असते. रीना तिला क्लास मध्ये नेते (म्हणजे बॅग घेऊन जाते क्लास मध्ये. रीनाला माहित नसतं त्यात Elly आहे म्हणून.) रीना बॅग ठेवते क्लास मध्ये आणि निघून जाते. (रीना prayers म्हणायला जाते.)

क्लास मध्ये Elly बराच वेळ वाट बघते की कोणी येतंय का! कोणी येत नाही असं बघून ती हळूच बॅगमधून बाहेर येते. इकडे तिकडे बघू लागते. काय काय मज्जा दिसते तिला!!

खूप drawings आणि paintings लावलेले असतात सगळीकडे. एका भिंतीवर झेंडा काढलेला असतो. भारताचा नकाशा असतो. Parts of Body आणि A B C भिंतीवर लावलेला असतं. एका भिंतीवर कलासमधल्या सगळ्या मुलांची नावं लिहिलेली असतात. सगळ्यांच्या birth dates लिहिलेल्या असतात. एका भिंतीवर मुलांचा हात पोचेल असा लांब फळा असतो त्यावर छोट्या छोट्या मुलांनी खडूने लिहिलेलं असतं. सगळीकडे कागदी छत्र्या लावल्या असतात, Rainy Season च्या!

Elly डोळे विस्फारून सगळ्या गोष्टींकडे बघत राहते. मग विचार करते क्लास इतका मस्त आहे तर शाळा पण किती छान असेल. मी जाऊन बघते. पण तेव्हड्यात तिला बुटांचे आवाज येतात. ती पटकन रीनाच्या बॅगमध्ये जाऊन लपते. 

सगळी मुलं आणि teacher आत येतात. Teacher attendance घेतात. रीनाचं पण नाव घेतात. रीना "Yes Miss!" असे म्हणते. मग attendance संपतं. 

मग Miss म्हणतात, "I'll take your homework notebooks bag. First, girls will give their notebooks. C'mon girls, give me your notebooks."

रीना बॅग उघडते notebook द्यायला, आणि "आSSS!" अशी ओरडते. Elly तिच्याकडे नुसतीच बघत राहते. 

Miss विचारतात, "What happened Reena? Why are you screaming?"

रीना सांगते, "Miss, there's a cat in my bag."

"What are you saying?"

"Look Miss, there's a cat in my bag."

"Let me see!"

सगळी मुलं जमतात बघायला! रीना दाखवते. Miss डोकावतात, मुलं डोकावतात! Elly सर्वांकडे टकामका बघते. एव्हड्या सगळ्यांना बघून Elly घाबरते. "म्याव म्याव" करायला लागते. रीना तिला हळूच उचलते आणि Miss च्या टेबलवर ठेवते. 

"Miss, this cat lives in my house garage."

"It's a kitten, Reena. It's a baby cat. But how did it get in your bag?"

"I don't know, Miss."

"It's OK. We'll keep the kitten safe till you can take her back home."

Miss मावशींना बोलावतात. त्या मावशींचं नाव वैशाली असतं. "Vaishali Mavshi, take this kitten away and feed her. Keep her safe till the school gets over."

मावशी Elly ला घेऊन जातात. तिला दूध देतात. छोटुकली Elly दमून गेली असते. ती छानश्या पोत्यावर झोपून जाते. 

तिकडे घरी Elly ची आई Elly ला शोधून-शोधून दमते. तिला कळतंच नाही की Elly गेली कुठे! रडत बसते ती. Elly चा बाबा पण शोधतो. पण तरी नाही मिळत. त्यांना वाटतं की कोणी माणसाने पळवून नेलं असणार पिल्लाला. दोघेही sad होऊन बसतात.

इकडे रीनाची स्कूल संपते. ती Elly ला घेऊन बस ने परत येते घरी. घरी येताक्षणी रीना तिच्या आईला हाक मारते, "ममा, हे बघ काय! आपल्या गॅरेज मधलं मांजरीचं पिल्लू माझ्या बॅगमध्ये लपून शाळेत आलं होतं."

रीना बॅग उघडून दाखवते. Elly बाहेर उडी मारते आणि गॅरेज कडे जाते लगेच. ती तिच्या आईला हाक मारते, "आई मी आले परत." तिला बघून आई-बाबा खूप खुश होतात. आई तिला huggy देते आणि विचारते, "अगं Elly, कुठे गेली होतीस तू?"

Elly तिची दिवसभराची गम्मत सांगते. तिची आई तिला समजावते, "Elly अगं मज्जा केलीस खरी. पण आम्ही किती काळजीत होतो. तू परत कधीही असं न सांगता कुठेही जायचं नाहीस. आईला किंवा बाबाला सांगून जायचं, आणि लवकर घरी यायचं. वेळेत घरी यायचं."

"सॉरी आई, मी परत असं नाही करणार."

"It's OK. पण मजा आली का?"

"हो, खूप मजा आली. आणि मला स्कूल बस मध्ये जाता आलं. आता मी मोठी झाले की मीपण स्कूलला जाणार!!"

Monday, August 7, 2017

सापांची गोष्ट

एका गावात एक मुलगा राहत होता. त्याचे नाव होतं गौतम. गौतम सगळ्यांशी खूप छान वागायचा. आई-बाबांना मदत करायचा. भरपूर खेळायचा आणि भरपूर अभ्यास पण करायचा. 

गौतमला प्राण्यांशी खेळायला खूप आवडायचं. तो सगळ्या प्राण्यांचे लाड करायचा, त्यांना खायला द्यायचा. कोणाला लागलं असेल तर दवा-पाणी करायचा. 

गम्मत म्हणजे गौतमला सर्व प्राण्यांची भाषा समजायची. त्याला त्यांच्याशी बोलायला खूप मज्जा यायची. 

एके दिवशी तो त्यांच्या घराच्या मागच्या बागेत खेळात होता, तेव्हा त्याला दोघांचे बोलण्याचा आवाज आला. 

"...आणि तो मला नुसता बघूनच पळून गेला."

"किती भितात ही माणसं आपल्याला!"

"हो ना. आपण तर विषारी पण नाहीयोत. खरं तर आपण माणसांना मदतच करतो."

"तर काय! आपण शेतातले उंदीर खातो. घरातल्या आजूबाजूचे उंदीर, घुशी खातो. त्यामुळे माणसांचं धान्यांचे नुकसान वाचते."

"आणि तरीही लोकं आपल्याला घाबरतात."

गौतमला लक्षात आला की हा संवाद दोन सापांमध्ये चालू आहे. तो त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, "खरं बोलताय तुम्ही दोघं. आम्ही माणसं उगाच घाबरतो तुम्हाला. मी तुमचा दोस्त बनेन आणि सगळ्यांना तुमच्या बद्दल सांगेन."

दोघेही साप happy झाले आणि गौतमला मदत करायला कबूल झाले. 

गौतम गावामध्ये सर्वांना शिकवायला लागला की साप कसे आपले मित्र आहेत, कसे विषारी आणि बिनविषारी साप ओळखायचे, साप चावला तर काय करायचे. हळू हळू लोकांना पटू लागले की  सगळेच साप विषारी नसतात व सापांचा आपल्याला किती उपयोग होतो ते.

एक दिवस पहाटे गणू अण्णा त्यांच्या शेतातून परत येत होते तेव्हा पाय घसरून पडक्या विहिरीत पडले. पाणी जास्त नव्हतं, पण खोल होती विहीर. अडकून राहिले बराच वेळ. गणू अण्णा घाबरून बसले होते. कारण त्यांना सारखा सापांचा आवाज ऐकू येत होता. 

उजाडत आलं तसं गणू अण्णांना विहिरीबाहेर चाहूल जाणवू लागली. त्यांनी एक-दोन हाका मारल्या, "कोणी आहे का? मला कोणी तरी बाहेर काढा."

नेमका गौतम तेथून जात होता. त्याने आवाज ऐकला. त्याने विहिरीच्या आत बघितलं. "अर्रे गणू अण्णा, तुम्ही ह्या पडक्या विहिरीत काय करताय?"

"गौतम का? मी मगाशी शेतावरून घरी जात होतो. पाय घसरून पडलो. माझ्या पायाला लागलाय. मला चढता येत नाहीये. आणि एव्हडे साप आहेत इथे. मला जाम भीती वाटत आहे. मला कृपाकरुन बाहेर काढ इथून."

"अहो अण्णा, सापांना का घाबरताय? नका घाबरू! ते काही नाही करत!"

तेव्हड्यात गौतमला सापांचे बोलणे ऐकू आले! "थांबा, थांबा, गणू अण्णा. साप काहीतरी सांगतायत."

"अरे गौतम, आम्ही कधी पासून त्यांना आवाज देतोय हे सांगायला की आम्ही मदत करतो. पण ते बिचारे खूपच घाबरले होते."

"बरं, बरं. पण कसं बाहेर काढायचा त्यांना? माझ्याकडे दोरी नाहीये."

गानू अण्णांना काय चालू होते ते कळतंच नव्हते. भांबाळलेल्या अवस्थेत नुसतेच गौतमकडे बघत होते. 

"गानू अण्णा, घाबरू नाकात हां. मी काढतो बाहेर तुम्हाला."

गौतमने सापांना विचारलं, "कसं करायचं?"

एक साप म्हणाला, "हा साप माझ्या शेपटाला गाठ घालेल. आणि तू आम्हाला आत सोड, विहिरीत. गणू अण्णांना सांग शेपूट पकडायला. आणि तू वर ओढ आम्हाला."

"अरे तुम्हाला जमेल का? अंग दुखेल ना."

"नाही, तू काळजी नको करु. आम्ही लवचिक असतो." दुसरा साप म्हणाला.

"गणू अण्णा, मी सापांची दोरी करून खाली सोडतो. तुम्ही त्यांना पकडून वर या. बिनविषारी साप आहेत. चावणार नाहीत. घाबरू नका."

गणू अण्णा मनातून जाम घाबरले होते. "राम राम, राम राम" करत सापांना पकडू लागले. "गणू अण्णा, साप काही भूत आहेत का! राम राम काय करताय!" गौतम हसायला लागला. 

कसे-बसे वर आले गणू अण्णा. पायाला लागलं होतं खूप. गौतमने त्याच्या शाळेच्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी दिलं. भीती कमी झाल्यावर गौतमला म्हणाले, "गौतम, तू खरंच हुशार आणि धीट आहेस. सापांच्या मदतीने मला बाहेर काढलंस! तू बरोबर म्हणाला होतास. साप खरंच आपले मित्र आहेत. आपण उगाच त्यांना घाबरतो!"

"पटलं ना तुम्हाला! मग झालं तर! चला आता डॉक्टर कडे जाऊयात. तुमच्या पायाला औषध लावायला पाहिजे."

असं म्हणत गौतम गणू अण्णांना घेऊन गेला. दोघे साप पण आपापल्या कामास निघून गेले. 

Wednesday, August 2, 2017

पांडा आणि हत्ती

ही गोष्ट मी सांगितली महिकाला. तिला हत्तीची गोष्ट हवी होती. मी म्हणाले हत्ती आणि पांडा दोघांची सांगते.

एक हत्ती होता. त्याला लहानपणापासून पोहायला आवडायचे. तो नदीत नेहेमी पोहायला जायचा.

एकदा त्या जंगलात पांडा आला. पांडाने सगळ्यांशी दोस्ती केली. सर्व animals चा friend झाला.

एके दिवशी तो पांडा खूप sad होऊन बसला होता. त्याला सश्याने विचारले, "काय झालं  तुला? असा sad का झाला आहेस?"

पांडा म्हणाला, "मला माझ्या sister कडे जायचं आहे."

"मग जा की!"

"पण ती नदीच्या पलीकडच्या जंगलात राहते."

"मग फोन कर तिला."

"नाही, मला भेटायचं आहे. राखी करता."

"ओह! मग आता काय करणार?"

"काय माहित!"

दुसऱ्या दिवशी ससा हत्तीला भेटला. तेव्हा हत्तीने विचारले, "काय रे? पांडाला काय झालं?"

सश्याने सांगितले काय झाले ते.

हत्ती म्हणाला, "हात्तिच्या! एव्हढच ना! तू एक काम कर. तू उद्या पांड्याला घेऊन नदीपाशी ये."

"का?"

"तू ये तर खरं. तिथे आल्यावर सांगेन काय ते."

सश्याने निरोप सांगितला पांडाला. पांडा दुसऱ्या दिवशी नदीपाशी गेला. तिथे हत्ती आलेला होता.

हत्ती म्हणाला, "चल, तुला जायचंय ना तुझ्या sister कडे?"

"हो. पण कसं जायचं?"

"मी नेतो ना तुला. तू माझ्या पाठीवर बस. मी पोहत नेतो तुला त्या बाजूला."

"तू खरंच नेशील मला?"

"हो, नेईन की! चल लवकर."

"थांब, थांब!"

"आता काय झालं?"

"मी माझ्या sister  करता gift नाही घेतली."

"चल, आपण जाऊन घेऊयात."

हत्ती आणि पांडा दोघे दुकानात गेले. तिथे पांडाला एक छानशी उशी आवडली. पण तो म्हणाला हत्तीला, "ही उशी तर पाण्यातून जाताना ओली होईल."

"अर्रे काही नाही ओली होणार. तू ही उशी मस्त sack मध्ये ठेव. sack पाठीला लाव. मी तुला बुडवणार नाही. मस्त माझ्या पाठीवर बस आणि आपण जाऊ."

पांडाला पटलं. त्याने उशी घेतली. दोघे नदीवर आले. पांडा हत्तीच्या पाठीवर बसला. हत्ती पाण्यात शिरला. मस्त पोहत पोहत दुसऱ्या काठावर गेला.

पांडा sister च्या घरी गेला आणि बेल वाजवली. तो हत्तीला म्हणाला, "मी लपून बसतो. आपण surprise देऊयात."

पांडाच्या sister ने दार उघडलं आणि हत्तीला विचारलं, "कोण आहे?"

"मी हत्ती आहे. शेजारच्या जंगलातून आलोय."

"OK. काय हवाय तुम्हाला?"

तेव्हड्यात पांडा आला तिच्या समोर आणि ओरडला, "Surprise!"

Sister ला खूप आनंद झाला. तिने पांडाला राखी बांधली. त्याला t-shirt gift दिला. पांडाने पण तिला gift दिले. तिला उशी खूप आवडली.

मग पांडा आणि हत्ती जेवले. संध्याकाळी परत घरी आले. पांडा हत्तीला "Thank You!" म्हणाला  दोघेही best friends झाले.