Monday, October 14, 2019

जिराफ आणि त्याची मान

एक जिराफ होता. त्याला एकदा उंच झाडावरची पानं खायची होती. त्याने ती पाने खायला सुरवात केली, पण तो एकदम घाबरून गेला. त्याला वाटले की त्याची मान उंच उंच होत आहे.

त्याने त्याचा मित्र मंकी ला बोलावले. तो म्हणाला, "बघ ना... माझी मान लांब लांब होत आहे." मंकी म्हणाला, "थांब, तू घाबरू नकोस. आपण डॉक्टरला बोलवूयात."

मंकीने लायन डॉक्टरला बोलावले. हा लायन डॉक्टर चांगला होता. कोणाला खायचा नाही, कारण तो डॉक्टर होता ना! त्या लायनचा फ्रेंड असतो lion king. तो खायचा सगळ्यांना.

लायन डॉक्टर आला. त्याने विचारले जिराफाला, "काय झालं रे?"

जिराफ म्हणाला, "माझी मान बघा ना, लांबच लांब झाली आहे."

डॉक्टर म्हणाले, "थांब हां, मी चेक करतो."

डॉक्टरने त्याला चेक केले. आणि म्हणाले, "अरे, तुला तर काहीच झाले नाहीये. तुला उंच पानं खायची होती ना! म्हणून तूच तुझी मान लांब केलीस!"

जिराफ म्हणाला, "अच्छा! असा होय!"

सगळे लोग जिराफ वर खूप हसले!

Thursday, October 10, 2019

भिकारी आणि मित्र

एक मुलगा असतो. तो खूपच बिचारा असतो. त्याच्याकडे पैसे नसतात. खायला पण नसते. त्याचा birthday असतो. तो सात वर्षांचा होतो. त्याचा एक friend असतो. तो खूप चांगला असतो. तो त्याला एक छोटासा मोबाइल देतो.
तो friend त्याला दर बर्थडेला काय-काय देतो. आठव्या बर्थडेला जीन्स देतो. दहाव्या बर्थडेला खूप पैसे. अकराव्या बर्थडेला खूप कपडे.

त्याच्या friend च्या बर्थडेला तो भिकारीपण पैसे जमवून एक रोबोट देतो. 

एके दिवशी त्या friend च्या घरी चोरी होते. आणि भिकारी त्या चोराला पकडून देतो!

So the moral of the story is: A friend in need is a friend indeed!!