Tuesday, December 13, 2016

राक्षस आणि ताटीका

 महिका आणि मी कार मधून जाताना:

महिका: मी तुला एक ताटीस (राक्षस) आणि एक ताटीका ची स्टोरी सांगू का?
मी: हो, सांग की.
महिका: थांब मला विचार करू देत.
मी: ओके, तू विचार कर.
महिका: एक ताटीस असतो. तो खूप वेळ थांबला असतो.
मी: कशाला थांबला असतो?
महिका: अगं, मंमं करायला.
मी: अच्छा. मग मिळतं का त्याला?
महिका: नाही ना. मग तो हॉटेल मध्ये जातो. पण तिथे पण त्याला पुरी मिळताच नाही.
मी: अर्रे बापरे. मग तो काय करतो?
महिका: तो बसून राहतो. मग तिथे ताटीका येते.
मी: अरे वाह! ती पण येते का हॉटेल मध्ये? ती काय करते?
महिका: ती पण येते आणि पुरी खाते. पुरी तिच्या पोटात जाते.
मी: अरे वाह! तिला मिळते का पुरी! आणि मग राक्षस काय खातो?
महिका: अरे तो पण पुरी खातो.
मी: Nice. मग काय होतं?
महिका: ताटीका ice cream खाते.
मी: Wow! मग राक्षस पण खातो का?
महिका: नाही तो अजून पुरी खातोय. मग नंतर खातो तो ice cream.
मी: गुड.
महिका: पण तो चमच्याने नाही खात.
मी: अरे! कसं  काय? मग कसा खातो ice cream?
महिका: तो बोटाने खातो, असा चाटत.
मी: हो का?
महिका: हो.

संपली गोष्ट!

Thursday, December 1, 2016

भूत आणि राक्षस

ही गोष्ट मला महिकाने सांगितली. तिने स्वतः तयार केली.

एक भूत असतं. ते खूप ढिशुम ढिशुम करतं 'wolves' बरोबर. आणि मग ते 'happy' होतं.
(This is one part of the story. There's another part that is not really connected to this, but which happens parallel to this, I think.) 
एक राक्षस असतो, baby  राक्षस. तो काय करतो माहितीये? तो एका समोरच्या माणूसला 'gadu gadu' करतो (गुदु गुदु). आणि मग तो माणूस खूपच हसतो आणि खाली पडतो. मग राक्षस हेल्मेट घालतो. आणि झुकझुक गाडी चालवत जातो. कुठे माहितीये? Mall मध्ये. आणि तिथे त्याला कोण भेटतं माहितीये... आया, बाबा, आणि अनय दादा. आणि मग सगळे निघतात. सगळे परत येतात. 

आया: अरे वा! मस्त गोष्ट आहे. मग mall मध्ये त्या 'टाटीस' (महिका राक्षसाला टाटीस म्हणते.) ला महिका पण भेटते का?
महिका: नाही, महिका नाही भेटत.


ही साठा उत्तराची कहाणी पाचा  उत्तरी सुफळ संपूर्ण!