
एक मॅन होता. त्याने एका ट्री वर छान फुलं बघितली...लोटस. छान वास येत होता सकाळी. एका दुसऱ्या माणसाचे ट्री होते. तर पहिल्या मॅन ने ती फुलं चोरली. फक्त एक फूल घेतलं, मग दुसरं, मग सगळी फुलं घेऊन गेला. बायकोकडे गेला. ती खूप चांगली होती. त्याने तिला surprise दिली फुलं. पण त्याने चोरी केली होती ना. मग तिने त्याला बाहेर काढलं.
एक दिवशी त्याने एका मुलीचे टेडी बेअर चोरले.
हे सगळे कोण बघत होते माहिती... एक पेंग्विन.
थोड्या दिवसांनी ज्याचे झाड होते तो माणूस आला ट्री ला पाणी घालायला. तिथे एक शिडी दिसली त्याला. आणि बघतो तर काय! फुलं गेलेली! त्याला चोर माहित होता. तो चोराच्या घरी गेला. चोर आत बसला होता. तो हळूच मागून गेला आणि चोराच्या पॉकेट मध्ये आग चं पत्र टाकलं (Like the
Howler in Harry Potter, I think!) आणि निघून गेला.
मग तो चोर जोरजोरात ओरडायला लागला, "आई आई आई बाबा बाबा बाबा!"

मग मोटू-पतलू आणि चिंगम आले. त्या चोराला म्हणाले, "तुला वरती आकाशात टाकले पाहिजे!" पतलूने हॅन्ड पकडला आणि आकाशात टाकले. तो वरून धाड करून रस्त्यावर पडला. मग चिंगम ने handcuffs लावल्या. चोराला जेलमध्ये टाकलं.

मग चोराची बायको, मोटू-पतलू , चिंगम हे सगळे फ्रेंड्स झाले आणि एकत्र राहायला लागले!
The moral of the story is you should not pluck flowers and fruits.