मी महिकाला एक दिवस विचारले की तुला गोष्टीमध्ये कोण कोण हवे आहे? तेव्हा तिने मला सिंह, आंबा, बकरी, आणि बिस्कीट हे सगळे पाहिजेत गोष्टीत असे सांगितले. म्हणून ही गोष्टं ...
एके दिवशी एक बकरी रस्त्याने जात होती. जाता-जाता तिला रस्त्यात biscuits पडलेली दिसली. ती खात-खात ती जायला लागली. तिच्या लक्षातच नाही आलं की चालता-चालता ती पोचली जंगलात.
जंगलात ती चालत होती घाबरत घाबरत. तेव्हड्यात तिच्या समोर आला एक सिंह. तो तिला म्हणाला, "बरं झालं बकरी तू आलीस! मला भूकच लागली होती. आता मी तुला खाऊन टाकतो!"
"नको रे नको सिंह दादा, मला नको खाऊस! मी तुला दुसरा खाऊ देते."
"छे! तुला सोडून दुसरा खाऊ कशाला खाऊ मी!"
तेव्हड्यात बकरीला आंब्याचे झाड दिसले. उन्हाळ्याचे दिवस होते. झाडाला भरपूर आंबे लागले होते. ती सिंहाला म्हणाली, "अरे तू कधी आंबा खाल्ला आहेस का?"
"आंबा? काय असतो आंबा? कसा असतो? कसा लागतो?"
"थांब, मी देते तुला खायला आंबा."
बकरीच्या झाडावरचा पिकलेला आंबा दिला. सिंहाला दाखवला कसा खायचा ते. सिंहाने जरा घाबरत-घाबरतच खायला सुरवात केली.
पहिली चव घेतली आणि त्याला इतका आवडला आंबा!
"वाह! काय मस्त आहे हा आंबा! Yummy yummy!!"
असा म्हणत म्हणत सिंहाने दाबून आंबे खाल्ले! आणि आंब्यासारखी मस्त गोष्टं खायला दिली म्हणून त्याने बकरीला सोडून दिले. आणि दोघेही friends झाले!